पुरोहितचा ताबा पुणे पोलिसांकडे

November 18, 2008 4:56 AM0 commentsViews: 2

18 नोव्हेंबर, मालेगावदीप्ती राऊतमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील दोन प्रमुख आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांचा ताबा पुणे पोलिसांनी मागितला होता. त्यानंतर न्यायालयानं प्रसाद पुरोहितचा ताबा पुणे एटीएसकडं दिला. प्रसादला उद्या पुणे कोर्टात हजर केलं जाणार आहे तसंच खडकी इथल्या चर्चवरील हल्ल्याप्रकरणी समीर कुलकर्णीचा ताबाही पुणे पोलिसांना ताबा पाहिजे होता. त्याचीही मागणी यावेळी न्यायालयात करण्यात आली. मालेगाव बॉम्बस्फोटातल्या 8 आरोपींना नाशिक कोर्टानं 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यात साध्वी प्रज्ञा सिंग, शामलाल साहू, रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

close