टीम अण्णांमध्ये फूट ; दोन सदस्य बाहेर

October 18, 2011 11:36 AM0 commentsViews: 3

18 ऑक्टोबर

जनलोपाल विधेयकसाठी एकत्र जमलेल्या टीम अण्णांमध्ये आता फूट पडली आहे. पी व्ही राजगोपाल आणि राजेंद्रसिह यांनी कोअर टिममधून बाहेर पडले आहेत. अण्णांची चळवळ आता राजकीय वळण घेत आहे असा आरोप करत हे दोनही सामाजिक कार्यकर्ते टीम अण्णामधून बाहेर पडले आहेत. राजेंद्र सिह हे मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत. दरम्यान राजगोपाल आणि राजिंदर यांच्या निर्णयावर किरण बेदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे मी ऐकलंय पण त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत काहीही सांगितलं नाही असंही किरण बेदी म्हणाल्या आहेत.

मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि टीम अण्णांचे सदस्य राजेंद्र सिंह यांनी टीम अण्णांच्या कोअर ग्रुपमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. हिसारमधल्या पोटनिवडणुकीत टीम अण्णांनी राजकीय भूमिका निभावल्याचा आरोप करत ते बाहेर पडत आहे. हिसारमध्ये काँग्रेसचे उमेदवार जयप्रकाश यांच्या पराभवाचे क्रेडिट टीम अण्णा घेत असतानाच त्यांना हा धक्का बसला. एकटे राजेंद्र सिंहच नाहीत तर एकता परिषदेचे पी. व्ही. राजगोपाल यांनीसुद्धा टीममधून बाहेर पडत असल्याचा आपला निर्णय अण्णांना कळवला आहे.

अण्णांचे हे दोन आता सहकारी छोट्या पण हळूहळू वाढत असलेल्या टीम अण्णांच्या टीकाकारांमध्ये सहभागी झालेत. अण्णांच्या 25 वर्षांपासूनच्या सहकार्‍यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली. पण टीम अण्णांनी मात्र हा आपल्याला धक्का असल्याच्या चर्चेचा इन्कार केला. काश्मीरच्या मुद्द्यावरून खुद्द अण्णा हजारे आणि प्रशांत भूषण यांच्यातच दरी निर्माण झालीय. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं स्पष्ट करत अण्णांनी त्यासाठी प्रसंगी पाकिस्तानशी लढण्याची तयारी असल्याचे नव्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. अण्णांचं सध्या मौनव्रत सुरू आहे. पण त्यांच्या टीममधल्या वाढत्या मतभेदांवर चिंतन करण्याची वेळ आलीय.

close