पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

October 19, 2011 12:19 PM0 commentsViews: 4

19 ऑक्टोबर

वर्धा जिल्हातील आर्वी पोलीस स्टेशनच्या आवारातच एका 27 वर्षीय तरुणाने पोलिसांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केली. आशिष सोमकुवर अस या तरुणाचं नाव असून तो भाजप पक्षाशी निगडीत आहे आणि सावळापूर ग्रामपंचायत सदस्य आहे. या तरुणांना टाटाची प्रवासी गाडी घेवून कॉलेजला लावली होती. पोलिसांना पैसे देवूनही नवीन डिवायएसपी आले म्हणून अजून पैशाची मागणी केल्याने आत्महत्या केल्याचे या तरुणांना मृत्यूपुर्वी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात नेला. मात्र जबाबदार पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह नेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.

close