हिंजवडी बलात्कार प्रकरणी तिन्ही आरोपी दोषी

October 19, 2011 4:24 PM0 commentsViews: 2

19 ऑक्टोबर

पुण्यातल्या हिंजवडी येथे विवाहित महिलेवर झालेल्या बहुचर्चित सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी आज पुणे सत्र न्यायालयात होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुभाष भोसले , गणेश कांबळे व रणजित गाडे या तिघांवरही बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलंय. या सर्वांना 21 ऑक्टोबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावण्यासंदर्भातला निकाल 21 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाने राखून ठेवला. 1 एप्रिल 2010 रोजी अमेरिकेहून आलेल्या एका विवाहित महिलेवर संगनमत करुन या तीन नराधम आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेची राज्य सरकारने विशेष दखल देत ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज तब्बल 15 महिन्यानंतर या निकालाची सुनावणी न्यायालयात घेण्यात आली. पीडित महिलेचे वकील म्हणून विशेष सरकारी वकील उज्वल निकम काम पाहत होते. त्यांनी आज युक्तीवाद करताना या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी अपिल केली. तर आरोपींच्या वकिलांनी आरोपींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती कोर्टाकडे केली.

close