येडियुरप्पा हॉस्पिटलमधून बाहेर ;कारागृहात पुन्हा रवाना

October 19, 2011 5:26 PM0 commentsViews: 7

19 ऑक्टोबर

भूखंड घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज हॉस्पिटलच्या बाहेर आले. पण, व्हिलचेअरवरून..आणि ऍम्ब्युलन्समधून ते जेलकडे रवाना झाले. येडियुरप्पा यांना शनिवारी अटक झाली होती. त्यानंतर छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना रविवारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. येडियुरप्पा जेलऐवजी हॉस्पिटलमध्ये राहतात अशा बातम्या मीडियाने दाखवल्या, त्यामुळे येडियुरप्पा दुखावले गेलेत त्यामुळेच त्यांनी आज हॉस्पिटलमधून डिस्चाार्ज घेतला असं त्यांच्या समर्थकांचे म्हणणं आहे. पण लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षांतर्गत भ्रष्टाचारावर केलेल्या वक्तव्यामुळे येडियुरप्पा नाराज झाल्याची असंही कळतंय. पक्षांतर्गत भ्रष्टाचार भाजपला कमकुवत बनवतोय असं अडवाणींनी नागपूरमध्ये म्हटलं होतं.

close