अनामी रॉय यांना कोर्टाकडून एक दिवसाची मुदतवाढ

November 18, 2008 5:41 AM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर, मुंबईसुधाकर कांबळेराज्याचे पोलीस महासंचालक अनामी रॉय याना मुंबई हायकोर्टानं एका दिवसाची मुदतवाढ दिलीय. त्यांची महासंचालक पदाची मुदत आज संपणार होती. त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणार्‍या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. पुढील सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे रॉय यांचं भवितव्य उद्या निश्चित होईल. रॉय यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा कॅटचा निर्णय योग्य असल्याचं हायकोर्टानं नुकतचं म्हंटलं होतं तसंच पुढच्या निर्णयाच्या आधी नव्या पोलीस महासंचालकाची नियुक्ती करावी, अशी सूचनाही हायकोर्टानं केली होती.

close