राहुल गांधींच्या सभेत रिव्हॉल्वरसह तरुणाला अटक

October 20, 2011 9:59 AM0 commentsViews: 2

20 ऑक्टोबर

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या सुरक्षेमध्ये कमतरता असल्याचं उघड झालं आहे. राहुल गांधी सध्या अमेठीच्या दौर्‍यावर आहेत. या सभेत एका तरुणाला रिव्हॉल्वरसह अटक केली गेली आहेत. हा तरुण राहुल गांधींच्या अमेठीच्या सभेमध्येअगदी स्टेजजवळ पोहोचला होता. त्याच्याजवळून रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. सध्या त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तर दुसरीकडे राहुल गांधींची गाडी गावकर्‍यांनी आडवली. येणार्‍या निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारालाच तिकीट द्या, अशी मागणी या गावकर्‍यांनी केली. केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबाजवणी कितपत झाली आहे याचा आढावा घेण्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या समस्या ऐकण्यासाठी राहुल यांचा हा दौरा आहे. तर यावेळी बोलताना केंद्राचा पैसा सामान्यांपर्यंत पोहोचतच नाही असा आरोप राहुल यांनी केला. त्याचबरोबर पैसा थेट गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचही राहुल गांधींनी मान्य केलंय.

close