अपशब्द वापरणार्‍या राज पुरोहितांवर आरोपपत्र दाखल

October 20, 2011 10:13 AM0 commentsViews: 3

20 ऑक्टोबर

भाजपचे मुंबई शहराध्यक्ष राज पुरोहित यांच्याविरुध्द आरोप पत्र दाखल झालं आहे. आझाद मैदान पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केलं आहे. महिलेला लाज वाटेल असं बोलल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. ठाण्यात पाणी पुरीवाल्याचा विकृतपणा उघड करणार्‍या अंकिता राणे या मुलीच्या चारित्र्यावरच राज पुरोहित यांनी एका जाहीर सभेत शिंतोडे उडवले होते. एका पुरूषाचं असलं व्हिडिओ शुटिंग करणार्‍या मुलीचं चारित्र्य काय असेल अशा शब्दात राज पुरोहित यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले होते. याहुन धक्कादायक प्रकार म्हणजे राज पुरोहित यांनी एका जाहिरसभेत ही मुक्ताफळं उधळली होती. त्यामुळे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

close