लवासाच्या बेकायदेशीर कामावर हातोडा !

October 20, 2011 10:59 AM0 commentsViews: 1

20 ऑक्टोबर

पुण्यातील लवासा सिटीचे जे बांधकाम केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बेकायदेशीर ठरवले आहे त्यावर दोन आठवड्यात कारवाई करा असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. लवासाचे 650 हेक्टर जागेवरचं बांधकाम पर्यावरण मंत्रालयानं बेकायदेशीर ठरवलं होतं. या 650 हेक्टरवरच्या जागेवरच्या बेकादेशीर बांधकामाविरोधात कारवाई करा आणि तीन आठवड्यात त्याबाबतचा अहवाल सादर करा असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. तसेच, संपूर्ण लवासा प्रकल्पाच्या बांधकामाला असलेल्या स्थगितीबाबतचे अंतिम आदेश पर्यावरण मंत्रालयाकडून आणा असंही हायकोर्टाने लवासाला सुनावलं आहे.

close