बेस्ट कर्मचार्‍यांना बोनस जाहीर

October 20, 2011 12:28 PM0 commentsViews: 4

20 ऑक्टोबर

बेस्टच्या कर्मचार्‍यांना अखेर दिवाळीची भेट मिळाली आहे. प्रशासनाने त्यांना सर्व कर्मचार्‍यांना 5 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. तर 5 हजार रुपये वेतनाची थकबाकी देण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्टच्या कर्मचार्‍यांनी दिवाळीसाठी 10 हजार रुपये मिळणार आहेत. पण शरद राव यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना बोनस देण्यात येणार नाही, असा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. पण औद्योगिक न्यायालयाने या कर्मचार्‍यांना बोनस देण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.

close