डोंबिवलीकर आता ‘कॅमेर्‍यात कैद’ !

October 20, 2011 5:31 PM0 commentsViews: 4

अजित मांढरे,मंुबई

20 ऑक्टोबर

डोंबिवलीत सव्वाशे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सुरक्षित आणि स्वच्छ डोंबिवली शहर हे दोन उद्देश ठेऊन डोंबिवलीकर, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी हे सीसीटिव्हीचं जाळं संपूर्ण डोंबिवलीभर उभं केलंय. 22 ऑक्टोबरला या सीसीटिव्ही कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी करणार आहे.

डोंबिवली शहरात आता तिसरा डोळा प्रत्येक नाक्यावर, चौकावर आणि कोपर्‍या- कोपर्‍यावर लक्ष ठेवणार आहे आणि हा तिसरा डोळा आहे सीसीटीव्ही कॅमेरा….एक -दोन नाही, तर तब्बल 125 सीसीटीव्ही कॅमेरे डोंबिवली शहरात मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे डोंबिवलीकरांनी सुरक्षेबद्दल समाधान वाटतंय.

विकास सोनी म्हणतात, संपूर्ण डोंबिवलीत सीसीटिव्ही कॅमेरे असल्यामुळे, एखाद्या ठिकाणी चोरी झाल्यास चोरांना पकडणं पोलिसांना सोपं जाईल. तर कॅमेर्‍यांमुळे शहरातल्या गुन्हेगारीलाही बर्‍याच प्रमाणात आळा बसेल, असं पोलिसांना वाटतंय.सीनिअर पीआय वाय.ए.मतकर म्हणतात, सोनं साखळी चोरीच्या घटनातील आरोपींना पकडने शक्य होईल, नाईट व्हिजन कॅमेरे असल्यामुळे रात्री होणार्‍या घरफोडी व इतर गोष्टीही कॅमेर्‍यामुळे उडकीस येतील.

डोंबिवली शहरात लावलेले 125 सीसीटिव्ही कॅमेरे हे इंटरनेटशी जोडले गेले आहेत. त्यामुळे जगातील कोणत्याही कोपर्‍यात बसून डोंबिवलीतील घडामोडी हे तुम्ही इंटरनेटच्या माध्यामातून पाहू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कॅमेर्‍यांमुळे श्हारात होणारं ट्रफिक नियंत्रित केलं जाईल, कचरा, कुंडीतच टाकला जातोय का यावर ही लक्ष ठेवलं जाणार आहे. शिवाय कचराकुंडी भरल्यास उचलण्यासाठी ताबडतोब गाड्याही पाठवल्या जातील,त्यामुळे सुरक्षेबरोबरच डोंबिवली स्वच्छ ठेवण्यासाठीही या सीसीटिव्हि कॅमेर्‍यांचा वापर होणार आहे.

डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण म्हणतात, लोकांच्या तक्रारी होत्या पण, खर्च खूप होता..शेवटी नागरिक, व्यापारी आणि मी आमदार निधीतून हे स्वप्न पुर्ण केलं. सुरक्षेचा प्रश्न आला की सरकार नेहमीच निधीच्या चणचणीचं कारण देतं. अशा राज्यसरकारने डोबिवलीकरांचा प्रयत्नांतून तरी काही शिकावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

close