टीम इंडियाची विजयाची हॅट्‌ट्रीक

October 20, 2011 5:46 PM0 commentsViews: 3

20 ऑक्टोबर

मोहाली वन डे मॅच जिंकत भारताने विजयाची हॅट्‌ट्रीक केली. अखेरच्या ओव्हरपर्यंत चुरशीच्या झालेल्या मॅचमध्ये भारताने इंग्लंडवर 5 विकेट आणि 4 बॉल राखून मात केली. आणि याचबरोबर पाच वन डे मॅचची सीरिजही 3-0 अशी जिंकली. पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 299 रन्सचं टार्गेट ठेवलं.

याला उत्तर देताना पार्थिव पटेल आणि अजिंक्य रहाणे या ओपनिंग जोडीनं 79 रन्स केले. पटेल 38 रन्सवर आऊट झाला. पण यानंतर रहाणे आणि गौतम गंभीरने दुसर्‍या विकेटसाठी 111 रन्सची पार्टनरशिप करत विजयाचा पाया रचला. गंभीर 58 रन्सवर आऊट झाला, तर रहाणेची सेंच्युरी थोडक्यात हुकली त्याने 91 रन्स केले. पण ही जोडी आऊट झाली, आणि यानंतर आलेले रैना आणि कोहलीही झटपट पॅव्हेलिअनमध्ये परतले. इंग्लंडने मॅचमध्ये कमबॅक केलं असं वाटत असतानाच कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने आणखी पडझड होऊ न देता भारताला शानदार विजय मिळवून दिला.

भारतीय टीमने इंग्लंडविरुध्द विजयाची हॅट्‌ट्रीक साजरी केली आणि या विजयाचा हिरो ठरला तो मुंबईकर अजिंक्य रहाणे. इंग्लंडविरुध्द पहिल्या दोन वन डेत रहाणेला मोठी खेळी करता आली नव्हती. पण त्याने ही कसर तिसर्‍या वन डे मॅचमध्ये भरुन काढली. आधी पार्थिव पटेलबरोबर आणि नंतर गौतम गंभीरबरोबर भक्कम पार्टनरशिप करत त्यानं विजयाचा पाया रचला. आक्रमक नाही पण सातत्यानं रन्स करत अजिंक्यनं इंग्लंडच्या बॉलर्सवर दबाव कायम ठेवला. त्याची पहिली वहिली सेंच्युरी थोडक्यात हुकली असली तरी त्यानं टीममधली आपली जागा भक्कम केलीय. अजिंक्य रहाणेनं 104 बॉलमध्ये 91 रन्स केले. यात त्यानं 6 फोर मारले. याच कामगिरीच्या जोरावर त्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला.

close