नाशिक पालिकेने केली आचारसंहिता भंग !

October 20, 2011 12:52 PM0 commentsViews:

20 ऑक्टोबर

नाशिक महापालिकेने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार विरोधकांनी केली आहे. नाशिक महापालिकेचा कॅश क्रेडिटचा निर्णय निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग करणारा असल्याची तक्रार विरोधक करत आहेत. दिडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्याच्या प्रस्तावाला नाशिकच्या महापौरांनी मंजुरी दिली. कमाई अठन्नी, खर्चा रुपय्या अशा अवस्थेत डबघाईला आलेल्या महापालिकेला सावरण्याचा हा देखावा असल्याची विरोधकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे मतदारांवर प्रभाव पडेल असे धोरणात्मक व महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत या निवडणूक आयोगाच्या आदेशाचे यात उल्लंघन करण्यात आल्याचं विरोधकांचे म्हणणं आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात नगरसेवक राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहे.

close