‘बिग बॉस’ मधून राहुल महाजन बाहेर

November 18, 2008 5:40 AM0 commentsViews: 7

18 नोव्हेंबर, मुंबई रोहित खिलनानी' कलर्स ' वाहिनीवरच्या ' बिग बॉस ' या बहुचर्चित कार्यक्रमातून राहुल महाजन बाहेर पडला आहे. ' बिग बॉस ' च्या घरांतून राहुल, राजा, जुल्फी आणि आशुतोष या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. कारण होतं घरी चांगलं जेवण मिळत नाही. या चौघांना घराबाहेरच्या सिक्युरिटीनं पकडून परत घरात पाठवलं. या चुकीबाबत बिग बॉसने चौघांना क्षमा मागण्याचा आदेश दिला. ' बिग बॉस 'च्या आदेशाचं पालन राहुल वगळता इतर तिघांनी केलं. राजा, जुल्फी आणि आशुतोषनं ' बिग बॉस 'ची माफी मागितली. मात्र राहुल महाजनने नाही. त्यामुळे ' बिग बॉसने ' राहुलला घरांतून निघून जाण्याचे आदेश दिले आहेत. ' बिग बॉस 'च्या घरात चांगलं जेवण मिळत नाही म्हणून राहुल, राजा, जुल्फी आणि आशुतोषने 16 नोव्हेंबरला घरांतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. राहुल आणि राजाला जेवण बनवता येत नाही. पण जुल्फी चांगलं चिकन बनवतो आणि आशुतोषचा घरचा ढाबा असल्याने त्याला चांगलं जेवण बनवता येतं. आणि असं असूनही ' बिग बॉस 'च्या घरांतून हे चौघं का पळून गेले, याचंच ' बिग बॉस 'ला आश्चर्य वाटत आहे.

close