पुण्यात वेताळ टेकडी बचावसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

October 20, 2011 1:06 PM0 commentsViews: 12

20 ऑक्टोबर

पुण्यातील वेताळ टेकडीवर ARAI या वाहन क्षेत्रात संशोधन करणार्‍या संस्थेला विस्तारीकरणाकरता आणखी जागा देऊ नये याकरता आंदोलन करण्यात येतंय. DAV पब्लिक स्कूल आणि गुरूकुल या शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि मानवी साखळी करून वेताळ टेकडीवर आंदोलन केलं. मुलांना प्रोत्साहन देण्याकरता ज्येष्ठ शास्रत्ज्ञ जयंत नारळीकर आणि पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळही हजर होते. 1971 साली पुण्यातील पौड रोडजवळ असलेल्या वेताळ टेकडीवर 24 हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रावर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया हा केंद्र सरकारच्या अवजड उद्योग खात्याशी संबंधित उपक्रम असून, ही संस्था सर्व वाहनांच्या चाचण्या घेण्याचं काम करते. आता या संस्थेला आणखी प्रयोगशाळा उभारण्याकरता वाढीव 35 हजार स्केवअर मीटर जागा लागणार आहे. पण पुणेकरांनी त्याला आता विरोध केला.

close