कलावतीबाईंच्या मुलीचा मृत्यू

October 20, 2011 12:58 PM0 commentsViews: 7

20 ऑक्टोबर

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या भेटीनंतर प्रकाशझोतात आलेल्या कलावती बांदूरकर यांच्या पाठीमागे लागलेलं दृष्टचक्र थांबवण्याचं नाव घेत नाही. पती, जावयानं आत्महत्या केल्यानंतर गेल्या महिन्यात कलावतीच्या चंद्रपूर जिल्हयात राहत असलेल्या मुलीचा मृत्यू झाला. सविता खामकर अस या मुलीचं नाव आहे. ती चंद्रपुरातील राळेगावमध्ये राहत होती. दिवाकर खामकर या तिच्या नवर्‍यापासून तिला एक मुलगा आणि मुलगी आहे. चहा बनवताना स्टोच्या भडक्याने साडीनं पेट घेतल्याचं तिन आपल्या मृत्युपूर्व जबाबात सांगितलं. गेल्या 1 वर्षापासून सविता आजारी असल्याचे राळेगावच्या गावकर्‍यांचं म्हणणं आहे. तर गरिबीमुळे कंटाळून तिनं आत्महत्या केली असवी अशीही शंका काही गावकर्‍यांना वाटतेय. गेल्याच वर्षी कलावती यांचे दुसरे जावई संजय कळस्कर याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. कलावतीचा पती परशुरामनही 2005 मध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती.

close