भूखंड बळकावणार्‍या मनसे नगरसेवकाला अटक आणि जामीन

October 20, 2011 1:04 PM0 commentsViews: 4

20 ऑक्टोबर

पुण्यातल्या कोथरूडमध्ये मोक्याच्या ठिकाणी 75 वर्षांचे, डॉ.मनोहर ठकार यांचा भूखंड बळकावण्याप्रकरणी मनसेच्या नगरसेवक रविंद्र धंगेकर आणि बिल्डर प्रविण बालगुडे सह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.मनोहर ठकार यांचा भूखंड बळकावण्यासाठी बिल्डर प्रविण बालगुडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकासह आपल्याला धमकावत असल्याची तक्रार या डॉक्टरांनी पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर पोलिसांनी बिल्डर आणि नगरसेवकावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना अटक झाली आणि जामीनही मंजूर झाला.

close