‘लो कर लो बात’, बैलांचीच पोलीस चौकशी !

October 21, 2011 4:50 PM0 commentsViews: 1

21 ऑक्टोबर

कोणत्याही चौकशीसाठी गुन्हेगार, साक्षीदार यांना पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते. पण आज मात्र ही वेळ आली आहे चक्क 2 बैलांवरती. पुणे पोलिसांनी हा प्रताप केला आहे. गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान बैलांचा छळ झाला या मुद्द्यावरुन पोलिसांनी मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मंडळाच्या पदाधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल केला. चौकशीसाठी बैलजोडीच्या मालकाला आत्तापर्यंत 3 वेळा पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं.पण तपासासाठी आज मात्र चक्क या बैलांची चौकशी पोलीस करणार आहे. आता या चौकशीत या बैलांवर झालेल्या अत्याचाराची पाहणी पोलीस करणार असल्याचं समजतं.

close