प्रधान समितीच्या अहवालाची अंमलबजावणी कधी होणार : हायकोर्ट

October 20, 2011 1:35 PM0 commentsViews: 5

20 ऑक्टोबर

प्रधान समितीच्या अहवालाची अंमलबजावणी केव्हा करणार असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. चार आठवड्यात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वाढत्या दहशतवादी हल्लायांविषयी मुंबई हायकोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर CISF च्या धर्तीवर राज्यसरकाकडून राज्य सुरक्षा प्राधिकरणाच्या स्थापनेत होत असलेल्या दिरंगाईबद्दलही नाराजी व्यक्त केली आहेे. CISF च्या धर्तीवर राज्य सरकार या प्राधिकरणाची स्थापना करणार असून उमेदवारांची निवड सुरु आहे. तसेच नियमावली तयार करण्याचं काम सुरु असल्याचं आज राज्य सरकारतर्फे न्यायालयात सांगण्यात आलं. मात्र अजूनही तुम्ही नियमच तयार करत आहात का अशी विचारणा हायकोर्टाने केली आहे.सध्या दहशतवादातचा धोका वाढता आहे. त्यामुळे दहशतवाद निपटून काढायलाच प्राधान्य द्यायला हवं असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

close