हिंजवडी बलात्कार प्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

October 21, 2011 5:57 PM0 commentsViews: 8

21 ऑक्टोबर

पुण्याच्या हिंजवडीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाने हा निर्णय दिला आहे. आरोपींविरोधात गुन्हे सिद्ध झाले आहेत. सुभाष भोसले, गणेश कांबळे आणि रणजित गाडे या तिघांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. या तीनही आरोपींना सामुहिक बलात्काराच्या आरोपाखाली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

पुण्यातल्या हिंजवडी येथे विवाहित महिलेवर झालेल्या बहुचर्चित सामुहिक बलात्कार प्रकरणी अखेर आरोपींना मरपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावणीत आली. 1 एप्रिल 2010 रोजी अमेरिकेहून आलेल्या एका विवाहित महिलेवर संगनमत करुन या तीन नराधम आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेची राज्य सरकारने विशेष दखल देत ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज तब्बल 15 महिन्यानंतर या निकालाची सुनावणी न्यायालयात घेण्यात आली. पीडित महिलेचे वकील म्हणून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काम पहात होते.

close