सातपुते हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

October 21, 2011 7:49 AM0 commentsViews: 6

21 ऑक्टोबर

नाशिकमध्ये झालेल्या सातपुते हत्याकांडप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली. त्यासाठी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम नाशिक कोर्टात आले होते. गेल्या वर्षी 3 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष सातपुते यांची तलवारीने हत्या करण्यात आली होती. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविका भारती ताजनपुरे यांचे पती आंबादास ताजनपुरे आणि त्यांचा मुलगा राहुल ताजनपुरे हे यातले मुख्य संशयित आरोपी आहेत. याप्रकरणाची सुनावणी येत्या 3 नोव्हेंबरपासून नाशिक क ोर्टात होणार आहे.

close