किरण बेदींवर हल्ल्याचा प्रयत्न फसला

October 21, 2011 11:39 AM0 commentsViews: 3

21 ऑक्टोबर

टीम अण्णांना वारंवार टार्गेट केलं जातं आहे. आज टीम अण्णांच्या सभेत हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. प्रशांत भूषण, अरविंद केजरीवाल आणि आता किरण बेदी यांच्यावरही हल्ला होणार होता मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून 10 जणांना अटक केली आहे. किरण बेदी यांच्यासाठी मेरठ येथे एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पतियाळा हायकोर्टाबाहेर अण्णा समर्थकांना मारहाण करण्यार्‍या भगतसींग क्रांती सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत असणार्‍या सतीत्तानंद सरस्वती यांनाही अटक करण्यात आली.

गेल्याकाही दिवसांपासून टीम अण्णांवर हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाच्या त्यांच्याच चेंबरमध्ये घुसून भगतसींग क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. तर दुसर्‍याच दिवशी याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पतियाळा हाऊस कोर्टाबाहेर अण्णा समर्थकांनी जबर मारहाण केली होती. हे हल्ले एवढ्यावरच थांबले नाही तर 18 ऑक्टोबर रोजी टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर जितेंद्र ठाकुर या तरूणाने चप्पल फेकली होती. आज मेरठ येथे माजी आयपीएस अधिकारी आणि टीम अण्णांच्या मुख्य सदस्या किरण बेदींवर हल्ला करण्याचा कट रचला गेल्याची शंका पोलिसांना आली. पतियाळा कोर्टाबाहेर अण्णा समर्थकांना मारहाण करणार्‍या भगतसींग क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सहभागी असेलेल्या काही जणांना कार्यक्रम स्थळापासून जवळच अटक करण्यात आली. एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच हिंदुस्तान मोर्चाचे सतीत्तानंद सरस्वती यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करताच कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांत धक्काबुक्कीही झाली.

close