आशाताईंचा वर्ल्ड रेकॉर्ड

October 21, 2011 12:10 PM0 commentsViews: 1

21 ऑक्टोबर

तिचा आवाज आणि तिचं व्यक्तिमत्व एव्हरग्रीन…तिच्या आवाजाची जादू आजही जगभर कायम आहे. आणि याचीच दखल जगानंही घेतली. आपल्या व्हर्सटाईल गाण्याने प्रत्येकाच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणार्‍या आशा भोसले यांचं नावं आता गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गेलंय. जास्तीत जास्त स्टुडिओ रेकॉर्डिंग केल्याच्या निमित्ताने आशाताईंचे नाव आता गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गेलंय. आतापर्यंत अकरा हजारांच्या वर गाणी त्यांनी गायली आहेत. त्यात सोलो, ड्युएट अशी गाणी आहेत. 20 भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. लंडनला झालेल्या एशियन ऍवॉर्ड कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. माझ्यावर नेहमीच अन्याय होत आला आज खर्‍या अर्थानं मी जागतिक दर्जाची गायिका झाल्याचं वाटतंय, अशा शब्दात आशा भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

close