केजरीवाल यांना दंड भरण्याची इन्कम टॅक्सची सूचना

October 21, 2011 12:25 PM0 commentsViews: 2

21 ऑक्टोबर

अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांना इन्कम टॅक्स विभागाने नोटीस बजावली आहे. 27 ऑक्टोबर पर्यंत साडे नऊ लाख जमा करण्याची सूचना केजरीवाल यांना करण्यात आली आहे. केजरीवाल यांनी रिव्हेन्यू सर्व्हिसचा 2006 मध्ये राजीनामा दिला होता. पण सेवेत असताना त्यांनी कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलं होतं. ते घेताना त्यांनी सर्व्हिस बाँडमधल्या अटींचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात केजरीवाल यांना आयटी विभागाने नोटीस बजावली होती. पण, केजरीवाल यांनी त्यावेळी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले होते.

close