खबरदार, मोठ्या आवाजाचे फटाके विकाल तर !

October 21, 2011 2:43 PM0 commentsViews: 15

21 ऑक्टोबर

दिवाळी आता काहीदिवसांवर येऊन ठेपली असतांना राज्यसरकारने फटाक्याविक्रेत्यांना झटका दिला आहे. मोठ्या आवाजांचे फटाके शोधून काढण्यासाठी फटाक्यांच्या दुकानांवर धाडी टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची भरारी पथकं राज्यभर नेमण्यात आली आहेत, अशी माहिती पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली. 90 डेसिबलपेक्षा मोठा आवाज करणार्‍या परराज्यातून येणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली. हे फटाके शोधण्यासाठी आता ही भरारी पथकं कारवाई करतील.

close