आमीरची आता छोट्या पडद्यावर एन्ट्री

October 22, 2011 11:46 AM0 commentsViews: 2

22 ऑक्टोबर

मोठ्या पडद्यावरचे कलाकार छोट्या पडद्यावर येणं काही नवीन नाही. आमिताभ, शाहरूख, सलमान आणि ह्रतिकनंतर आता छोट्या पडद्यावर एन्ट्री करतोय मिस्टर परफेक्शनिस्ट. आमीर खान आता स्टार प्लसच्या एका नव्या शोमध्ये आपल्याला दिसणार आहे. हा शो भारतातल्या रिअल लाईफ स्टोरीवर बेतलेला असणार आहे. ज्यात लोकांच्या थरारक कहाण्या, त्यांनी केलेला खडतर प्रवास यांचं कथन खुद्द आमीर करणार आहे. हा शो एकाच वेळी मराठी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये सादर होणार आहे. अँकर म्हणून आमीरला पाहाणं ही त्याच्या फॅन्ससाठी एक नक्कीच पर्वणी ठरेल.

close