नितीन गडकरी लढवणार लोकसभेची निवडणूक !

October 22, 2011 1:52 PM0 commentsViews: 2

22 ऑक्टोबर

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली. पण आपल्याला कुठल्याही पदाची आशा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपमध्ये सध्या पंतप्रधान पदासाठीचे अनेक इच्छुक आहे. त्यात गडकरींचीही भर पडल्याचं बोललं जातं आहे. पण आपल्याला अशी कुठलीच इच्छा नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच 2 जी घोटाळ्याची पूर्ण जबाबदारी काँग्रेसची आहे. पंतप्रधान ही जबाबदारी टाळू शकत नाहीत असं मत नितीन गडकरींनी व्यक्त केलं. 2 जी प्रकरणात आजच पटियाळा हाऊस कोर्टाने माजी मंत्री ए. राजा आणि द्रमुक नेत्या कनिमोळींवर आरोप निश्चित केले आहेत.

close