किरण बेदींची वागणूक चूकीची – संतोष हेगडे

October 21, 2011 5:26 PM0 commentsViews: 5

21 ऑक्टोबर

अण्णांच्या टीममधील मतभेद दिवसेंदिवस पुढे येत आहेत. आज न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी किरण बेदींवर नाराजी व्यक्त केली. किरण बेदींनी जर संबंधित संस्थांना अंधारात ठेवून विमान प्रवासाची बिलं फुगवून दिलं असतील तर ते चुकीचं आहे असं त्यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना म्हटलं आहे. यापूर्वी हेगडेंनी अण्णांच्या रामलीला मैदानावरच्या उपोषणाला आणि नंतर काँग्रेसविरोधात प्रचार करायच्या निर्णयालाही विरोध केला होता. आपण फक्त भ्रष्टाचाराचा सामना करण्याच्या मुद्द्यावर टीममध्ये आहोत. इतर कुठल्याही मुद्द्याशी आपला संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. पण काही मतभेद असले, तरी आपण टीम सोडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

close