राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरेंवर राणेंचा हल्लाबोल

October 22, 2011 2:15 PM0 commentsViews: 5

22 ऑक्टोबर

राष्ट्रवादी काँग्रेसला गर्भित इशारा देत नारायण राणे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वादाच्या आगीत आणखीनच तेल ओतलं. रत्नागिरीत काँग्रेस मेळाव्यात बोलताना राणेंनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाच टिकेचं लक्ष केलं. राष्ट्रवादीकडे उर्जा खातं आहे, पण जैतापूरक डे कोणीही फिरकलं नाही अशी टीकाही राणेंनी केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीने खडकवासलाच्या पराभवातून काही तरी शिकावे असा टोलाही नारायण राणेंनी लगावला. निवडणुका स्वबळावर लढण्याची आपली तयारी असल्याचंही राणेंनी म्हटलं आहे. तर शिवसेनेवर निशाना साधत उध्दव ठाकरेंवर खरमरीत टीका केली. बाळासाहेबांनी गेल्या 40 वर्षात जे कमावलं आहे ते उध्दव पाच वर्षात संपवतील याचा विडाच त्यांनी उचलला आहे. उध्दव म्हणजे अधोगती प्रगती नाही ते तर उध्दव ठाकरे नाही उध्वस्त ठाकरे असा टोलाही राणे यांनी लगावला.

close