स्टॉलमध्ये ट्रक घुसल्याने 1 ठार

October 22, 2011 2:30 PM0 commentsViews: 2

22 ऑक्टोबर

नागपूरमध्ये आज एक विचित्र अपघातामुळे एका महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. शहरातील वसंतराव देशपांडे हॉलमध्ये डॉ. आंबेडकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या हॉलच्या खाण्याच्या स्टॉलजवळ जनरेटचा ट्रक बंद अवस्थेत उभा होता. ड्रायव्हर आणि त्याच्या सहकार्‍याने तो सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि अचानकपणे तो ट्रक सुरु झाला आणि ड्रायव्हरचा पाय हा ऍक्सलरेटरवर पडल्याने तो या स्टॉलमध्ये घुसला. यावेळी स्टॉलमध्ये जेवणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले. या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर दोन विद्यार्थीनी जखमी झाल्या आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय.

close