गाडी मालकांची गांधीगिरी

October 22, 2011 12:03 PM0 commentsViews: 2

22 ऑक्टोबर

औरंगाबदमध्ये आज एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. पटपडताळणीसाठी जिल्हाभर दौराकरण्यासाठी वापरलेल्या गाड्यांचे पैसे अजूनही या गाडी मालकांना मिळालेले नाहीत. गाडी मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणि जिल्हा परिषदेकडे वारंवार चकरा मारुनही पैसे मिळत नव्हते. या त्रासाला कंटाळून गाडी मालकांनी गांधीगिरी करत आज जिल्हा परिषदेच्या आवारातच 700 गाड्या लावून निषेध व्यक्त केला. आम्हाला गाडी भाडे लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणीही यावेळी गाडी मालकांनी केली.

close