कपातीविरोधात विडी कामगारांचं आंदोलन

November 18, 2008 6:55 AM0 commentsViews: 7

18 नोव्हेंबर, सोलापूर सोलापुरात विडी कामगारांनी केंद्र सरकार आणि विडी कारखाना मालकांच्या विरोधात धरणं आंदोलन केलं. केंद्राच्या धूम्रपानविरोधी कायद्याच्या विरोधाबरोबरच कारखाना मालकांनी घेतलेल्या 40 टक्के कामगार कपातीच्या निर्णयाचाही निषेध या आंदोलनात करण्यात आला. कारखाना मालकांच्या संपावरही टीका करण्यात आली आहे. सरकारनं योग्य निर्णय घ्यावा, नाहीतर सोलापुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा यावेळी खासदार नरसय्या आडम यांनी दिला.

close