आर्थिक डबघाईला आलेली अकोला महापालिका बरखास्त

October 22, 2011 4:19 PM0 commentsViews: 3

21 ऑक्टोबर

काँग्रेसची सत्ता असलेली अकोला महापालिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बरखास्त केली. स्थानिक राजकारणाने ग्रासलेली ही महापालिका आर्थिक डबघाईला आली होती. त्यामुळे शहरातील स्वच्छता आणि आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम होऊ लागला होता. अशातच चतुर्थ श्रेणी कर्माचार्‍यांनीही ज्यादा पगारासाठी आंदोलन छेडलं होतं. अशा अनेक कारणांमुळे अखेर ही महानगरपालिका बरखास्त करण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला. आणि तसे आदेशच मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी काढले. 2 महिन्यांपूर्वी प्रदेश काँग्रेसनंदेखील महापौरांवर निलंबनाची कारवाई केली होती. पण स्थानिक राजकारणातून हे निलंबनही मागे घेण्यात आलं होतं. आगामी 10 महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये अकोला महापालिकेचाही समावेश आहे

अस्वच्छतेच्या कारणांसह कर्मचार्‍यांच्या पगारासहीत आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे गेल्या 4 महिन्यांपुर्वी चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांनी पगार न मिळाल्यामुळे आंदोलन केलं होतं. त्यामुळे एका आंदोलकाने आत्महत्याही केली होती. या व इतर महत्त्वाच्या कारणांमुळे नगरविकास सचिवांनी महापालिका बरखास्त का करण्यात येऊ नये अशा प्रकारची कारणे दाखवा नोटीस महानगरपालिकेला बजावली होती. मात्र महानगरपालिकेनं योग्य उत्तर न दिल्यामुळे अखेरीस राज्य शासनाने महानगरपालिका बरखास्त केली. विशेष म्हणजे अजूनही 4 महिने पालिकेचा कार्यकाळ बाकी होतं. अकोला मनपात काँग्रेसच सत्तेवर असताना काँग्रेस सरकारने अशा प्रकारची नामुष्कीची कारवाई केल्याचं जनसामान्यांचं मत आहे.

close