केंद्र सरकाराची राज्यांच्या कामकाजात ढवळाढवळ – मोदी

October 22, 2011 4:39 PM0 commentsViews: 47

22 ऑक्टोबर

राज्य सरकारच्या कामकाजात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप यूपीए सरकारवर होतोय. दिल्लीत आज राष्ट्रीय विकास परिषदेची बैठक झाली. त्यात अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले. यावेळी गुजरात आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सर्व घटनात्मक संस्थांना त्यांची कामं करु द्यावी त्यात हस्तक्षेप करु नये असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललीता या परिषदेला स्वत: हजर नव्हत्या. पण त्यांनी पत्रातून आपली नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारची वागणूक फॅसिस्टवादी असल्याचे त्यांनी पत्रात म्हंटलं आहे.

close