आकाश कंदील स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस

October 22, 2011 11:11 AM0 commentsViews: 4

22 ऑक्टोबर

नाशिकमध्ये जाणीव ग्रुप आणि आयबीएन लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने इकोफ्रेंडली आकाश कंदील स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. गंगापूर रोडवर भरणार्‍या या स्पर्धेसाठी अत्यंत सुबक आणि कलात्मक असे आकाश कंदील दाखल होत आहेत. प्लॅस्टीक आणि थर्माकॉलचा वापर टाळून स्पर्धकांनी अत्यंत कल्पक कंदिल तयार केले आहेत. रविवारी सकाळी या स्पर्धेचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. तर संध्याकाळी स्वप्नील बांदोडकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.

तुम्हीही तुमचा इकोफ्रेंडली कंदील घेऊन आजही या स्पर्धेत सहभागी व्हा आणि पर्यावरण संरक्षणासोबतच मिळवा भरघोस बक्षीस. प्रथम पारितोषिक 11 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 7 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 5 हजार रुपये देण्यात येणार आहे.

तुमचा इको फ्रेंडली कंदिल घेऊन आजच संपर्क करा – जाणीव ग्रुप, आनंद अभ्यासिका, विद्याविकास सर्कलजवळ, कुसुमाग्रज स्मारकाशेजारी, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क- 9764443998

close