पाकवर हल्ला झाल्यास अफगाणिस्तान पाकच्या पाठिशी !

October 22, 2011 4:36 PM0 commentsViews: 3

22 ऑक्टोबर

पाकिस्तानविरोधात कुणी युद्ध पुकारलं तर पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहू असं अफगाणिस्तानने स्पष्ट केलं. पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनलला अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझई यांनी आज एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय. अमेरिका असो किंवा कुणीही असो, पाकिस्तान आपला भाऊ आहे आणि भावाला कधीच दगा देणार नाही, असं करझईंनी म्हटलं.

close