राज्यात गेल्या चार वर्षात 215 बिबट्यांचा मृत्यू

October 23, 2011 9:51 AM0 commentsViews: 1

23 ऑक्टोबर

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात 215 बिबट्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आयबीएन लोकमतला वनविभागाच्या सुत्रांनी दिली. बिबटे मानवी वस्तीकडे येण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षापासून वाढलंय. यामुळे अनेक ठिकाणी बिबटे आणि गावक-यांमध्ये संघर्ष होतोय. त्यातून बिबटे मरण पावल्याची माहिती पुढे आली आहे. मागील तीन वर्षात 40 तर गेल्या वर्षी सर्वाधिक 15 बिबट्यांची शिकार झाली आहेत. अनेक ठिकाणी जंगलाचे कॉरीडॉर नष्ट झाल्यानं अपघातासह विहिरीत पडून जवळपास 55 बिबटे ठार झाले. आणि नैसर्गिकरित्या 90 बिबटे मरण पावले आहेत. त्याचबरोबर बिवट्यांच्या हल्ल्यातही अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

गेल्या चार वर्षातील मृत्यू झालेल्या बिबट्यांची आकडेवारी

2008 – 60 बिबटे2009 – 48 बिबटे2010 – 57 बिबटे 2011- 40 बिबटे

close