इकोफ्रेंडली आकाश कंदील स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

October 23, 2011 10:15 AM0 commentsViews: 71

23 ऑक्टोबर

जाणीव ग्रुप आणि आयबीएन लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली आकाश कंदील स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अत्यंत कल्पक असे एकाहून एक सरस असे आकाश कंदील स्पर्धकांनी या स्पर्धेत आणले होते. फक्त कापडच नाही तर बांबू, कागद, पत्रावळी अशा अनेक पर्यावरणपूरक साहित्याने हे आकाश कंदील करण्यात आलेत. या आकाशकंदिलांमध्ये प्लास्टीक आणि थर्मोकॉलचा वापर अजिबात करण्यात आलेला नाही. याआकाशकंदिलांचे प्रदर्शनही भरवण्यात आलंय. आज संध्याकाळी गायक स्वप्निल बांदोडकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं बक्षिस वितरण होणार आहे. नाशिकच्या गंगापूर रोडवर हे प्रदर्शन भरलं आहे.

close