राज ठाकरेंच्या जामिनावर पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला

November 18, 2008 7:39 AM0 commentsViews: 2

18 नोव्हेंबर, मुंबई विनोद तळेकर विक्रोळी कोर्टात राज ठाकरे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार आहे.फेब्रुवाारी महिन्यात मनसेच्या आंदोलनानंतर राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सशर्त जामिनही मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी जामीन देताना कोर्टानं घातलेल्या अटींचं पालन राज ठाकरे करत नसल्यानं त्यांचा जामिन रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची याचिका राज्य सरकारनं सादर केली होती. त्यावर गेल्या महिन्यात दोनदा सुनावणी करण्यात आली. सरकारच्यावतीनं विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन तर राज ठाकरे यांच्यावतीनं हर्षद पोंडा यांनी बाजू मांडली होती.

close