राज्यभरात बसु बारसनिमित्त गोपूजन

October 23, 2011 10:51 AM0 commentsViews: 10

23 ऑक्टोबर

दिन दिन दिवाळी, गाईम्हशी ओवाळी असं म्हणत दिवाळीला सुरवात झाली आहेत. आज वसुबारस…अर्थात गोवत्स द्वादशी…राज्यभरात ग्रामीण भागात आजही वसुबारसेपासूनच दिवाळीची सुरूवात होते .नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही वसुबारस साजरी करण्यात येतेय. शेतकर्‍याची लक्ष्मी म्हणजे गुरंढोरं. म्हणूनच गाईवासराची पुजा करण्यात येते. गाईवारसाला ओवाळून पुरणाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. शेतकर्‍याच्या बांधाबांधावर गाईवारसाचं पूजन करण्यात आलं. कोल्हापुरातही राधानगरीच्या कसबा तारळेमध्येही सुवासिनींनी गायवासराची पूजा केली. आपल्या संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. गोमातेला सजवून गावातील विविध भागांत तिची पूजा करण्यात आली.

close