रत्नागिरीत होडी बुडून चार जणांचा मृत्यू

October 23, 2011 10:59 AM0 commentsViews: 1

23 ऑक्टोबर

रत्नागिरीजवळच्या साखरतर खाडीत छोटी होडी बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. या चार जणात होडी चालकासह 5 ते 8 वर्षांच्या तीन लहान मुलांचा समावेश आहे. एका छोट्या लाकडी होडीतून पाच लहान मुलं आणि होडीवाला असे सहा जण साखरतर खाडीतून कामानिमित्त जात असताना हा अपघात झाला. होडीतल्याच दोन लहान मुलांनी किना-यावर पोहत येऊन ही घटना गावकर्‍यांना सांगितल्यानंतर गावकर्‍यांनी शोध घेतला. ही सर्व मुलं मच्छीमार कुटूंबातील असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने साखरतर गावावर शोककळा पसरली.

close