नागपूरकरांचा रांगोळी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

October 23, 2011 8:21 AM0 commentsViews: 84

23 ऑक्टोबर

दिवाळी म्हणजे प्रत्येक घरासमोर रांगोळी हवीच..दिवाळीच्या निमित्ताने आयबीएन लोकमत आणि मैत्री संस्थेच्या वतीनं नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाच्या कलादालनात रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. दिवाळीच्या या खास स्पर्धेत मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पहिलं बक्षिस पाच हजार रुपये, दुसरं बक्षिस तीन हजार तर तिसरं बक्षिस दोन हजार आहे. बक्षिस वितरण समारंभ आज संध्याकाळी नागपुरच्या महापौर अर्चना डेहेणेकर यांच्या हस्ते होणार आहे.

close