गुजरात दंगलीप्रकरणी मोदींवर खटले चालवले जाऊ शकता

October 23, 2011 11:30 AM0 commentsViews: 3

23 ऑक्टोबर

गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी आता पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोदींविरोधातील खटले चालवले जाऊ शकतात अशी शिफारस ऍमिकस क्युरींच्या अहवालात करण्यात आली आहे. तसेच सर्व साक्षीदारांची उलटतपासणी झाली पाहिजे असंही ऍमिकस क्युरींनी सांगितलंय. या अहवालानुसार मोदींविरोधात दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणं आणि लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून खटला चालवला जाऊ शकतो. त्यामुळे याप्रकरणी नेमलेल्या एसआयटीचा अहवाल आणि ऍमिकस क्युरींच्या अहवालात तफावत आढळतेय. निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या फेरतपासणी करण्याबद्दलही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

close