धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी बाजारात गर्दी

October 24, 2011 11:24 AM0 commentsViews: 2

24 ऑक्टोबर

वसुबारसेपासून दिवाळी सुरु होते आणि दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी असते धनत्रयोदशी. बोलीभाषेत तिला धनतेरससुद्धा म्हणतात. आज धनत्रयोदशी धनाची पूजा करण्याचा दिवस. याचबरोबर सोने खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम मुहूर्त मानला जातो. त्यामुळे सकाळपासूनच सराफांच्या दुकानात गर्दी होत आहे.आज सोन्याचा भाव तोळ्याला 27 हजार 370 रूपये इतका आहे. मागिल महिन्यात सोन्या चांदीचे भाव उतरल्यामुळे सोन खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारात गर्दी केली आहे.

धनत्रयोदशीचा दिवस आयुर्वेदाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा.. कारण आज आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. आजच्याच दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी देवानं अमृतकलश आणला अशी आख्यायिका सांगितली जाते. धन्वंतरीबरोबरच आजचा दिवस व्यापारी वर्गासाठीसुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. धनतेरसला व्यापारी आपल्या संपत्तीची पूजा करतात. तसेच आजपासून हिशोबासाठी नवी वही वापरली जाते. दागिने, अलंकार यांच्यासह विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग आणि पैशांची पूजा आज केली जाते.

close