दिवाळीनंतर साखर निर्यातीवरची बंदी उठवणार – शरद पवार

October 24, 2011 1:40 PM0 commentsViews: 2

24 ऑक्टोबर

दिवाळीनंतर साखर निर्याती वरची बंदी उठविणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी इंदापूर तालुक्यातील अंशुर्णे येथील शेतकरी मेळाव्यात दिली. त्यामुळे ऊस उत्पादकांना चांगला दर मिळेल असे ही पवार यांनी सांगितलं. या कार्यक्रमात साखर कारखाने बंद पाडणार्‍या शेतकरी संघटनांवर त्यांनी टीका केली. बंद पाडायला अक्कल लागत नाही कारखाने चालू करायला अक्कल लागते असंही पवार म्हणाले.

close