पाकने भारतीय सैन्य अधिकार्‍यांना सोडले

October 23, 2011 1:09 PM0 commentsViews: 7

23 ऑक्टोबर

आज दुपारी खराब हवामानामुळे भारतीय सैन्याचं एका हेलिकॉप्टर भरकटत पाकव्याप्त काश्मिरात गेलं. पाकिस्तानने हेलिकॉप्टरसह अधिकार्‍यांना ताब्यात घेतलं होता. याप्रकरणी दोन्ही देशात सविस्तर चर्चा झाल्यानंतर अधिकार्‍यांना सोडून देण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय सेनेचे दोन अधिकारी आणि दोन पायलट आहेत. POKच्या स्कार्डू सेक्टरमध्ये हे हेलिक्टर उतरलं होतं. भारतीय हेलिकॉप्टरने हवाई सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानच्या अधिकार्‍यांनी केला. POKच्या 25 किलोमीटर आत हे हेलिकॉप्टर शिरलं होतं. या संदर्भात भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकार्‍यांसी चर्चा झाल्यानंतर त्यांना सुखरूप सोडून देण्यात आलं.

close