सिटी ग्रुप बँक करणार 50 हजार कर्मचार्‍यांची कपात

November 18, 2008 7:47 AM0 commentsViews: 3

18 नोव्हेंबर, मुंबईसिटीग्रुप बँकेनंही त्यांच्या आंतरराष्ट्रीय शाखांमधून 50 हजार कर्मचार्‍यांची कपात करायचं ठरवलंय. ' सिटीग्रुप ' चे सीईओ विक्रम पंडित यांनी लंडनमध्ये ही घोषणा केली. बँकेला यावर्षी सुमारे 20 अब्ज डॉलरचा तोटा झालाय, त्यामुळे 3 लाख कर्मचार्‍यांपैकी सुमारे 20 टक्के कर्मचार्‍यांवरचा खर्च बँकेला कमी करायचाय. त्यासाठी वर्षभरात 23 हजार जणांना बँकेनं काढलं आहे. नोकर्‍या मिळवून देणारी एक जागतिक कंपनी ' मॅनपॉवर ' वर देखील कर्मचार्‍यांची कपात करण्याची वेळ आलीय. भारतातून मिळणार्‍या उत्पन्नामध्ये 15 टक्के घट झाल्याचं कारण कंपनीनं दिलंय. त्यांचे जगभरात 35 हजार कर्मचारी आहेत आणि त्यापैकी भारतात 600 कर्मचारी आहेत.

close