अवयवदानामुळे देऊ शकतात इतरांच्या आयुष्यात प्रकाश !

October 24, 2011 1:50 PM0 commentsViews: 2

अलका धुपकर, मुंबई

24 ऑक्टोबर

दिवाळीचा सण हा प्रकाशाचा सण असतो. पण प्रकाश हा फक्त पणत्या लावूनच येतो, असं नाही. अवयवदानामुळे तर अनेकांच्या आयुष्यात दात्यांनी प्रकाश दिला. जळगावपासून 35 किलोमीटर अंतरावर समरोड हे गाव आहे. तिथले शेतकरी अशोक चौधरी यांचं मुंबईत निधन झालं. चौधरी कुटुंबाला अवयवदानाबद्दल काहीच माहिती नव्हती. मेडिकल सोशल वर्करने यावेळी पुढाकार घेऊन दिलेल्या माहितीनंतर दीपकने बाबांच्या किडनी दान करायचा निर्णय घेतला.

पण अशा किडनी दात्यांची संख्या ही मागणीपेक्षा अपुरी आहे. महाराष्ट्र या क्षेत्रात पिछाडीवर असताना तामिळनाडू सारख्या राज्याने मात्र अवयवदानात धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करुन अवयवदानात आघाडी घेतलेय.

नातलग किडनी द्यायला तयार असतात, पण स्वत:च्या पेशंटना त्यांची किडनी मॅच होत नाही, अशा नातलग-पेशंटच्या जोडींमध्ये किडनीची देवाणघेवाण करुन स्वॅप ट्रान्सप्लाँट करता येतं. पण या स्वॅप ट्रॉन्सप्लाँटमध्ये येणार्‍या कायदेशीर अडचणींपुढे पेशंट् आणि नातलग बेजार होऊन जातात.

किडनी दान हे जिवंतपणीही करता येण्यासारखं दान आहे. दुसर्‍याच्या आयुष्यात प्रकाश आणणारी असं दान द्यायची संधी आधुनिक वैद्यकशास्त्राने तुम्हाला दिलीय. ती वाया घालवू नका….

close