मुख्यमंत्र्यांनी निरूपम यांना खडसावले

October 24, 2011 5:10 PM0 commentsViews:

24 ऑक्टोबर

उत्तर भारतीयांनी मनात आणलं तर मुंबई बंद पाडू शकतो काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांच्या वक्तव्याचा समाचार आता खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण घेतला. मुंबई कोणाला बंद करु देणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशा स्पष्ट शब्दात निरूपम यांना खडसावलं. निरुपम यांना असा घरचा आहेर मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच मुंबई सुरळीत राहणार ही आमची जबाबदारी आहे अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये बोलत होते. आज नागपुरात काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्राततून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. उध्दव ठाकरे यांनी तर मुंबई बंद पाडूनच दाखवा असा इशारा दिला.

close