बदनामीचे चांडाळ-चौकडीचे कारस्थान – अण्णा हजारे

October 24, 2011 4:29 PM0 commentsViews: 14

24 ऑक्टोबर

टीम अण्णांच्या सदस्यांवर होणार्‍या आरोपांने व्यथीत झालेले जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगमधून कडाडून टीका केली. टीम अण्णांवर आरोप करून बदनामी करण्याचा काही लोकांचा उद्योग सुरू आहे. टीमच्या सदस्यांवर आरोपकरण्याचा डाव सुरू आहे. आमच्यात कशी फूट पाडण्याचा प्रयत्न वारंवारपणे सुरू आहे. सरकारमध्ये काही लोक चांगले आहे पण चांडाळ-चौकडीमुळे त्यांची गळचेपी झालेली आहे. यांच्यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण कसा होईल अशी विरोधकांची इच्छा आहे अशी घणाघाती टीका अण्णांनी केली.

जनलोकपाल विधेयकाच्या लढाई जिंकल्यानंतर टीम अण्णांवर विरोधांनी चौफेर टीकेचे झोड उडवली. एवढेच नाहीतर टीम अण्णांचे सदस्य प्रशांत भूषण यांना भगतसींग क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. तसेच अण्णा समर्थकांनीही जबर मारहाण केली. हे एवढ्यावरच थांबत नाही तेच मागील आठवड्यात मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न झाला. प्रशांत भूषण यांच्या प्रकरणापासून अण्णांनी मौनवृत्त धारण केलं. पण हे त्यांचं व्यक्तीगत मौनवृत्त आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. वेळोवेळी अण्णांनी आपल्या ब्लॉगमधून विरोधकांचा समाचार घेतला. अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्यावर होणार्‍या आरोपनंतर अण्णा पुन्हा आपल्या ब्लॉगमधून विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

अण्णा आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतात, किरण बेदीवर हवाई प्रवासामध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप होत आहेत, किरण बेदींनी वेळोवेळी हे स्पष्ट केले आहे की, हवाई प्रवासामध्ये मी भ्रष्टाचार करून माझ्या कुटुंबासाठी पैसा वापरला असला तर सरकारकडे ज्या चौकशी यंत्रणा आहेत, अशा यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी आणि मी दोषी असेन तर माझ्यावर कठोर कार्यवाही करा. मात्र अशी चौकशी करायला सरकार तयार नाही, फक्त आरोप करून बदनाम करणे एवढयाच उद्देशाने काही लोकांनी उद्योग सुरू केलेला दिसतो. किरण बेदीवर झालेला आरोप हा नवीन आरोप नाही. तर ‘टीम अण्णा’मधील प्रत्येक जणावर आरोप करून ‘टीम अण्णा’ला बदनाम करण्याचा प्रयत्न या चौकडीकडून झालेला आहे. ही आरोप करणारी मंडळी कोण? ज्यांना ‘ जनलोकपाल’ बिल नको आहे. अशीच मंडळी या आरोप करणार्‍यांमध्ये असल्याचे दिसून येते.सुरवातीपासूनचे उदाहरण पाहिले तर लक्षात येईल की , जेव्हा ‘जनलोकपाल’ बिलाचा मसुदा करण्यासाठी संयुक्त समिती करावयाची होती. त्या संयुक्त समितीला विरोध करणारे कोण? लक्षात येईल की हीच चौकडी होती. अशी घनाघाती टीका अण्णांनी केली.

close